क्राईम न्यूजमुंबई
Trending

 Firing at Badlapur Railway Station : बदलापूर रेल्वे स्थानकावरील गोळीबार प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे संतप्त ट्विट

Aaditya Thackeray On  Firing at Badlapur Railway Station : आदित्य ठाकरे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे

मुंबई :- बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरील एक Firing at Badlapur Railway Station धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक तरुण स्थानकावरच गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात तसेच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या गोळीबार प्रकरणावर ट्विट करत संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळतच चालली आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार असोत, कोयता गँगसदृश घटना असोत की वारंवार होणारे गोळीबार महाराष्ट्रातील शहरं आणि गावं या गुन्हेगारीने ग्रासून गेलेली आहेत, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, काल तर बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाला आणि राज्याचे गृहमंत्री मात्र पक्ष फोडणे, कुटुंब तोडणे, खोटा इतिहास शिकवणे, प्रचार करणे यातच व्यस्त आहेत. आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली या शिंदे-भाजपाने, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर घणाघात केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0