क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mobile Robbery News : KEM हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे मोबाईल चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; भोईवाडा पोलिसांकडून 9 मोबाईल फोन हस्तगत

Bhoiwada Police Latest News : 50 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 10 दिवसांच्या सापळ्यानंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई | मुंबईच्या परेल परिसरातील प्रसिद्ध के.ई.एम. (KEM) हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात भोईवाडा पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख रुपये किमतीचे एकूण 9 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. Mumbai Latest KEM Hospital Robbery Case

डॉक्टरांच्या तक्रारीवरून तपासाला सुरुवात

या प्रकरणातील फिर्यादी हे के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. 4 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री त्यांच्या सॅमसंग कंपनीचा मोबाईल अज्ञात इसमाने लंपास केला होता. या तक्रारीनंतर भोईवाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

50 सीसीटीव्ही आणि 10 दिवसांचा ‘वॉच’

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी परिसरातील साधारण 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. तो सराईत गुन्हेगार फिरोज इस्माईल शेख (वय 40 ) असल्याचे निष्पन्न झाले. तो प्रामुख्याने मध्यरात्रीच्या सुमारास मोबाईल चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने हॉस्पिटल परिसरात सलग 8 ते 10 दिवस सापळा लावला. 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री च्या सुमारास फिरोज शेख पुन्हा चोरीच्या उद्देशाने तिथे आला असता, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

अशी झाली वसुली

आरोपी फिरोज शेखची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचे 2 मोबाईल सापडले. त्यानंतर सखोल चौकशी आणि तपासादरम्यान त्याच्याकडून अन्य 7 असे एकूण 9 मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले. जप्त केलेल्या या मुद्देमालाची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे.

यांनी केली यशस्वी कामगिरी

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) आणि पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-4) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर, पोलीस निरीक्षक नितीन महाडीक यांच्या सूचनेनुसार पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक सचिन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भोंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.

परिसरातील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0