Financial Fraud News : इस्टेट एजंटची जवळपास 12 लाखांची आर्थिक फसवणूक, 40% नफाच्या आमिषाला बळी
डोंबिवली :- ऑनलाइन आर्थिक फसवणूक Financial Fraud News झाल्याची घटना डोंबिवलीतून समोर आली आहे. या घटनेमध्ये इस्टेट एजंटचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला 40% चे नफ्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. जवळपास 12 लाखापर्यंत रक्कम गुंतवून करून आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती डोंबिवली पोलिसांनी दिली आहे. Dombivli Crime News
40% नफ्याचे आमिष, जवळपास बारा लाखाची आर्थिक गुंतवणूक
श्रीकांत नारायण पाखले (55 वर्ष) हे इस्टेट एजंट असून यांचा डोंबिवली पूर्व येथे व्यवसाय आहे. त्यांना मे ते जुलै या महिन्याच्या दरम्यान मोबाईल फोनवर अज्ञात महिलेने आणि व्यक्तीने मेसेज करून त्यांना दोन लिंक पाठवल्या होत्या. त्यानंतर लिंक वर गुंतवणूक करण्यास सांगितले होते. गुंतवणूक केल्यास 40% नफा मिळेल असे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडत श्रीकांत यांनी त्या दोन्ही लिंक मध्ये 11 लाख 91 हजार 683 रुपयाची ऑनलाईन गुंतवणूक केली होती. परंतु गुंतवणूक केलेले कोणतीही आर्थिक रक्कम परत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरळे हे करत आहे. तसेच पोलिसांकडून सायबर विभागाच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे. Dombivli Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…