Financial Fraud News : आर्थिक फसवणूक : 147 गुंतवणूकदारांना चुना लावणाऱ्या कंपनीच्या मालकाला केले अटक
Financial Fraud News : जी. व्ही. आर.एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 7 ते 10 टक्के व्याजदर मिळेल या आमिषाला बळी पडून तब्बल 147 गुंतवणूकदारकांची आर्थिक फसवणूक, कंपनीच्या मालकाला एक वर्षांनी केली अटक
“Mystery of the Missing Funds: The Untold Story of 147 Investors and a Shady Company”
मुंबई :- आर्थिक गुन्हे शाखा मुंबई Mumbai Crime Branch यांची कामगिरी जी.व्हि.आर. एक्सपोर्ट इम्पोर्ट या कंपनीचा मालक वेंकटमनन गोपालन (56 वर्ष, तामिळनाडू चेन्नई) याला अटक करण्यात आली आहे. तब्बल 147 लोकांची 147 Investors आर्थिक फसवणूक Financial Fraud करून हा गेल्या एक वर्षांपासून फरार होता. मालकाने कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास सात ते दहा टक्के व्याजासह परतावा देण्याचे अमिष दाखविले होते. तसेच एकूण 17 कोटी 94 लाख 75 हजार रुपयाची 147 गुंतवणूकदारकांची Mystery of the Missing Funds आर्थिक फसवणूक केली होती. Mumbai Latest Crime News
कंपनीच्या मालकाला एक वर्षानंतर अटक, 147 गुंतवणूकदारकांची आर्थिक फसवणूक
जी.व्ही.आर या कंपनीमध्ये शेतमालाची आयात निर्यात करण्याची बतावणी केली असून उद्योग वाढवण्यासाठी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक आहे तसेच गुंतवणूकदाराला ठेवी रक्कमेवर दर महिन्याला 7 ते 10 टक्के व्याजदर मिळेल असे आमिष दाखविले होते. डिसेंबर 2021 ते मार्च 2023 या कालावधीमध्ये एकूण 146 गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास सांगितले. जीव्हीआर एक्सपोर्ट इम्पोर्ट कंपनी ही सांताक्रुज मुंबई येथे भाड्याने घेतलेल्या जागेवर चालवत होता. या संदर्भात वेंकटरमनन गोपालन यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखा, येथे कलम 409, 420 सह भादवि 3 आणि 4 एमपीआयडी कायदा अन्वये 07 जुलै 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या एक वर्षापासून कंपनीचा मालक आरोपी हा फरार होता. तसेच तो स्वतःच्या अस्तित्व लपवण्यासाठी विविध ठिकाणी राहत होता. Mumbai Latest Crime News
11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
आर्थिक गुन्हे कक्ष-14 विभागातील तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय लोंढे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम, पोलीस हवालदार नलावडे व आव्हाड यांचे पथकाने तिरूपती, आध्रप्रदेश येथे 2 ते 3 दिवस सापळा रचून अत्यंत शिताफिने गुन्हयातील आरोपी नामे वेंकटरमनन गीपालन यास नमुद गुन्हयात दिनांक 3 जुलै 2024 रोजी अटक केली आहे. आरोपीस न्यायालयाने दिनांक 11 जुलै 2024 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे. Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे विभाग मुंबई निशिथ मिश्र, पोलीस उप आयुक्त संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक पोलीस आयुक्त गोकुळसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बागल यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे. Mumbai Latest Crime News
आरोपीची चौकशी सुरू आहे
अटक आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून तपासी अधिकारी हे गुन्हयातील गुंतवणुकदाराच्या गुंतवणुकीच्या रक्कमेचा विनियोग कशा प्रकारे केला आणि त्याचे साथीदारांबायत सखोल तपास करीत आहेत. गुंतवणुकदारांची गुंतवणुकीची रक्कम हस्तगत करण्याच्या दृष्टीने तपास चालू आहे. Mumbai Latest Crime News