Nalsopara Crime News : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई — पोलिस निरीक्षक सौरभी पवार यांच्या पथकाची यशस्वी मोहिम
नालासोपारा | अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांनी मोठी कारवाई करत अवैध वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका महिला दलालास अटक केली असून, तिच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसायात लोटलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. Female prostitute arrested in Nalasopala; Two female victims rescued
पोलिस निरीक्षक सौरभी पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, शितल जय जाधव (वय 45, रा. मालाड पश्चिम) ही महिला मोबाईलद्वारे गिऱ्हाईकांशी संपर्क साधून त्यांच्यासाठी मुली पुरवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून बोगस गिऱ्हाईक आणि पंचाच्या मदतीने 15 जून रोजी नालासोपारा पूर्व येथील रेल्वे स्टेशनच्या चार नंबर प्लॅटफॉर्मजवळ छापा टाकला.
यावेळी शितल जाधव ही महिलांना पैशाच्या बदल्यात वेश्यागमनासाठी प्रवृत्त करत असल्याचे स्पष्ट झाले. तिच्यावर आचोळे पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम 143(3) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांच्या पथकाने केली असून, या घटनेमुळे अवैध वेश्याव्यवसायाच्या टोळ्यांवर पोलिसांनी जोरदार धडक दिली आहे.
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी चाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार उमेश गवई, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, महेंद्र शेट्ये, अमित चव्हाण, महिला पोलीस हवालदार सुप्रिया तिवले, पोलीस हवालदार सुनिल पागी, सर्व नेम. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्टरित्या केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…