FedEx Cyber Fraud : सायबर चोरट्यांकडून फेडेक्स कुरिअरद्वारे फसवणूक, सायबर पोलिसांची दमदार कामगिरी फसवणुकीतील पैसे परत मिळवून देण्यात यश

Nalasopra FedEx Cyber Fraud : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांनी फसवणुकीतील रक्कम मूळ खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे
नालासोपारा :- सायबर चोरट्यांकडून Cyber Fedx Fraud फेडेक्स कुरिअरद्वारे पाठविण्यात आलेले पार्सलच्या पॅकेटमध्ये पत्ता नसल्याचे सांगत पत्ता आणि पाच रुपयाचे ट्रांजेक्शन करण्यास सांगितले असून, त्यानंतर दोन लाख 69 हजार रुपयांचे पैसे कट झाल्याचा मेसेज काशिमिरा पोलीस ठाण्याच्या Kashmira Police Station हद्दीत राहणाऱ्या राठोड यांना आला होता.
याप्रकरणी राठोड यांनी सायबर पोलीस विभागाच्या NCCRP Portal तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी राठोड यांच्या तक्रारीनंतर संबंधित खात्याची पाहणी करून फसवणुकीत कपात झालेली रक्कम दोन लाख 69 हजार 586 रुपये पोलिसांनी पडताळणी करून मूळ खात्यावर परत आणून दिले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध चालू आहे. मागील काही दिवसांपासून फेडेक्स कुरिअर च्या नावाने मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. या प्रकरणी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारे कुरिअरच्या कंपनीमधून बोलत असल्याचे बतावणी केली असता त्याच्या पडताळणी करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलीस पथक
अविनाश अंबरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार विलास खाटीक,राहुल बन, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे यांनी पार पाडली आहे.