Mumbai Pune Express Accident : कार पलटी झाल्याने भीषण अपघात; अपघातात चार सहकारी गंभीर जखमी
पनवेल :- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कोन गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असफिया बानो मोहम्मद फरीद खान (वय 22) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत तिच्यासोबत प्रवास करणारे चार सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. निष्काळजीपणे आणि वेगाने गाडी चालवल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. Mumbai Pune Express Accident News
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, टोयोटा अर्बन क्रुझर कार (क्रमांक UP 32 MU 2287) चा चालक नूर आलम खान (वय 34) याचे नियंत्रण सुटले आणि कारने अनेक वेळा पलटी घेतली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये असफिया खानला गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. इतर चार जखमींना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मूळची उत्तर प्रदेशातील रायबरेलीची रहिवासी असलेली असफिया खान, सोशल मीडियावर एक लोकप्रिय चेहरा होती. इन्स्टाग्रामवर तिचे अडीच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. फॅशन, प्रवास आणि लाइफ स्टाइल ब्लॉगसाठी ती ओळखली जात असे. मनोरंजन क्षेत्रासोबतच ती राजकारणातही सक्रिय होती आणि उत्तर प्रदेशच्या समाजवादी पार्टीला उघडपणे समर्थन देत होती. तिच्या अचानक जाण्याने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून, सोशल मीडियावर अनेक जण श्रद्धांजली वाहत आहेत. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…