मुंबई

Fake Trading App : ‘फेक ट्रेडिंग ॲप’च्या जाळ्यातून सायबर पोलिसांची यशस्वी सुटका! तक्रारदाराला परत मिळाले तब्बल 28 लाख रुपये

• सोशल मीडियावरील जाहिरातीवर विश्वास ठेवणे भोवले; उत्तन येथील महिलेची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक

मीरा-भाईंदर :- सोशल मीडिया आणि ‘फेक शेअर ट्रेडिंग ॲप’च्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीवर मीरा-भाईंदर, वसई-विरार सायबर पोलिसांनी मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे! उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेची फसवणूक झालेली 28 लाख 10 हजार 593 इतकी मोठी रक्कम परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

दिव्या (नाव बदलले आहे) या तक्रारदार महिलेने सोशल मीडियावरील टेलीग्राम ॲपवर ‘ऑनलाइन शेअर ट्रेडिंग’ ॲपमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळत असल्याची आकर्षक जाहिरात पाहिली. जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी सदर ॲपमध्ये मोठी रक्कम गुंतवली. मात्र, त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सायबर पोलिसांची तत्परता

तक्रार दाखल होताच सायबर पोलिसांनी तात्काळ NCCRP Portal वर नोंद घेतली. ऑनलाईन तक्रार नोंदवल्यामुळे, फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा होताच ती थांबविण्यात पोलिसांना यश आले.

फसवणुकीच्या व्यवहाराचा कसून तपास करून, पोलिसांनी संशयीत 15 बँक खात्यांची माहिती मिळवली आणि वारंवार पत्रव्यवहार करत 8 बँक खात्यांमधील रक्कम थांबवली.

5 महिन्यांचा अथक पाठपुरावा

थांबवलेली रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून देण्यासाठी सायबर पोलिसांनी न्यायालयामध्ये सविस्तर अहवाल सादर केला. न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या 8 बँकांसोबत सतत 5 महिने पाठपुरावा केला. त्यांच्या या अथक परिश्रमामुळे अखेर तक्रारदार महिलेची फसवणूक झालेली 28 लाख 10 हजार 593 ही संपूर्ण रक्कम त्यांच्या मूळ खात्यात सुरक्षितपणे परत जमा करण्यात आली.

तक्रारदारांना ही रक्कम परत मिळाल्याची माहिती प्रतीकात्मक चेक देऊन देण्यात आली. पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सुजितकुमार गुंजकर आणि सायबर पोलीस ठाण्याच्या टीमने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago