मुंबई
Trending

Mumbai News : काँग्रेसला आणखी एक धक्का; प्रा. मोहन वनखंडे यांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश

Congress Vice President Join Shivena : काँग्रेसला आणखी एक धक्का; प्रा. मोहन वनखंडे यांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेशमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश; सांगलीत काँग्रेसमधील पडझड सुरूच

मुंबई | काँग्रेसला सांगली जिल्ह्यात पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे यांनी अखेर शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला असून, त्यांच्या प्रवेशाचे स्वागत मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. Congress Vice President Join Shivena यावेळी आमदार सुहास बाबर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह इतर स्थानिक नेते उपस्थित होते.

प्रा. वनखंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी असंतोष व्यक्त केला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) प्रवेशाबाबतही चर्चा केली होती. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती.

यानंतर प्रा. वनखंडे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी, बुधवारी रात्री मुंबईत मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) प्रवेश केला. मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं की, “उपमुख्यमंत्री शिंदे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या नेतृत्वाची भूमिका निभावत आहेत, आणि योग्य वेळी योग्य संधी दिली जाईल.”

सांगली जिल्ह्यात काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून जोरदार गळती लागली आहे. ज्येष्ठ नेत्या जयश्री पाटील, अनेक माजी नगरसेवक, आणि माजी महापौरांनी भाजपचा हात धरला आहे, तर काही जण राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले आहेत. काँग्रेस नेते आ. डॉ. विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याने थोडा दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण वनखंडेंसारख्या नेत्याच्या जाण्यामुळे पक्षात अस्वस्थता अधिक वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0