Fake Police Call : मुंबई क्राईम ब्रँच मधून बोलत आहे, असे सांगून महिलेला तब्बल 12.50 लाखाचा गंडा
Fake Police Fraud Call : FedEx international Courier, मुंबई ते थायलंड असे पार्सल पाठवले असून, त्यामध्ये MDMA ड्रग्स, महिलेला 12.50 लाखाचा गंडा, मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
डोंबिवली :- FedEx international Courier सर्विस या कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुमचे पार्सल मुंबई ते थायलंड असे पाठवलेले आहे. त्यामध्ये पाच पासपोर्ट, तीन क्रेडिट कार्ड, MDMA व्ड्रग्स असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या महिलेची तब्बल 12.50 लाख रुपयाचे फसवणूक झाल्याची तक्रार Fraud Call त्या महिलेने डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात Manpada Police staion केली आहे. Dombivli latest Crime News
फिर्यादी महिला 32 वर्षीय असून ती लोढा पलावा डोंबिवली पूर्व येथे राहत आहे. त्या महिलेला फेडेक्स इंटरनॅशनल कुरियअर कंपनीतून कॉल करून तुम्ही मुंबई ते थायलंड येथे पाठवलेला पार्सल मध्ये बेकायदेशीर वस्तू असल्याचे सांगितले. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रँच येथून बोलत असे विश्वास संपादन करून त्यांनी त्या महिलेच्या विविध खात्यावरून एकूण बारा लाख 53 हजार 90 रुपये ऑनलाईन भरण्यास सांगून तिची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रार महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात दिली आहे.पोलिसांनी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुसळे हे करीत आहेत. Dombivli latest Crime News