Fake Police Arrested : तोतया पोलिसांनी दोन कोटींची खंडणी मागणी ; दोन विद्यार्थ्यांचे अपहरण
Pune Crime Branch Arrested Fake Police : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे कारवाई दोन्ही आरोपींना अटक ; पोलिसांनी आठ लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे :- पोलीस Maharashtra Police असल्याची बतावणी करीत दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करणार्या टोळीतील दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या Pune Crime Branch खंडणी विरोधी पथकाने अटक केली. योगेश विश्वास सावंत (34 वर्ष, रा.अकलूज, जि. सोलापूर) आणि ज्ञानेश्वर विलास घाडगे (26 वर्ष, रा.माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी Pune Police आरोपींकडून आठ लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी 21 वर्षीय विद्यार्थ्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात Hinjwadi Police Station फिर्याद दिली आहे. Pune Police latest News
फिर्यादी व त्यांचा मित्र हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. यावेळी दोन कारमधून आलेल्या आरोपींनी दोघांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. तसेच, आरोपींनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवत दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, पैसे न मिळाल्याने आरोपींनी 50 हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, 1 लाख 25 हजार रुपये किंमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 15 हजारांचे घड्याळ असा ऐवज मारहाण करून काढून घेतला. त्यांना मारहाण करून फलटण येथे रात्रभर डांबून ठेवले. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी पंढरपूर महामार्गावर सोडून दिले. Pune Police latest News
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त यांनी खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाला समांतर तपासाचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळाजवळील तसेच टोलनाक्यावरील 70-80 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपी माळशिरस येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, एक टीम माळशिरस येथे रवाना करण्यात आली. फौजदार सुनिल भदाणे व टीमने स्थानिक पोलीसांच्या मदतीने सावंत, घाडगे यांना अकलूज येथून ताब्यात घेतले. त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्ट कार व दोन मोबाईल असा 8 लाख 40 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी घाडगे पोलीस रेकॉर्डवरील असून, त्याच्यावर वेळापूर पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच, इतर आरोपींवरही खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अॅट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. Pune Police latest News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-2 बाळासाहेब कोपनर, यांचे मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, ज्ञानेश्वर कुन्हाडे, किरण काटकर, आशिष बोटके, प्रदीप गायकवाड तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार हुलगे यांचे पथकाने केली आहे