पुणे, १४, महाराष्ट्र मिरर : Fake Medicine Pune
बनावट औषधांचा खुलेआम चालणारा काळाबाजार आता एफडीएच्या रडारवर आला आहे. पुण्यातील वानवडी येथील एका हॉस्पिटलमधून बनावट औषधे पकडल्यानंतर शिक्रापूर येथील फार्मास्युटिकल्स औषध निर्मिती कंपनीच्या मालकासह तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Fake Medicine Pune, Crime News Pune
याबाबत अधिक माहिती अशी कि, अन्न-औषध प्रशासनाने मार्च २०२५ मध्ये वानवडी येथील हॉस्पिटलमधून बनावट औषधे पकडली होती. औषधे प्रतिमा फार्मास्युटिकल्समध्ये बनविली गेल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांची चौकशी केली असता, कुठल्याच औषधे निर्मितीची परवानगी नसताना औषधे बविल्याचे उघडकीस आले. Fake Medicine Pune, pune news, pune crime news, pune police news
अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक मनोज अय्या (वय ४५, रा. स्पाईन रोड, मोशी, पुणे) यांनी शिक्रापूर पोलिसांकडे फिर्याद दिल्यावरून डॉ. प्रतीक पलांडे, गुणवत्ता नियंत्रक संदीप क्षीरसागर, उत्पादन अधिकारी अंजन शेळके व रमेश डोमले (चौघेही रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिमा फार्मास्युटिकल्स Pratima Pharmacitucals Shikrapur या औषध निर्मिती कंपनीने मानवी आरोग्यास घातक असलेल्या २१ बनावट औषधे उप्तादित केली व पुण्यासह मुंबईत वितरित केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे कंपनी मालक डॉ. प्रतीक पंडित पलांडे यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल केले. याबाबत शिक्रापूर पोलिसांकडे अन्न आणि औषध प्रशासनाने रविवारी (ता.१३) फिर्याद दाखल केली आहे. सर्व आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की,
प्रतिमा फार्मास्युटिकल्स कंपनीने पुणे व मुंबईत २१ प्रकारची औषधे वितरित झाल्याची सखोल माहिती घेतली. पोलिसांनी त्यांच्याकडून ५५ लाख ६२ हजार ९३ रुपये आणि त्यासोबत काही कागदपत्रे जप्त केली. याप्रकरणी प्रशासनाकडून फार्मास्युटिकल्सला नोटीस बजावून त्यांची सुनावणी घेतली.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…