Fake IAS Officer Nabbed : वाहतूक पोलिसांनाही गंडा; मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न
मुंबई : मुंबईत चक्क बनावट IAS अधिकारी असल्याचा आव आणून शासकीय यंत्रणेला गंडवणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. चंद्रमोहन प्रसाद रामबळी सिंह (वय 32) असे या तोतया सनदी अधिकाऱ्याचे नाव असून तो मूळचा बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील रहिवासी आहे. Fake IAS Officer Nabbed गेल्या दोन दिवसांपासून तो वांद्रे कुर्ला संकुल येथील सीमाशुल्क विभागाच्या पन्हाळा गेस्ट हाऊसमध्ये ‘शासकीय पाहुणा’ म्हणून राहात होता.
गुन्हे शाखा कक्ष-12 ला मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील सिल्वर ओक हॉटेलजवळ एक मोटारगाडी भारत सरकारचा फलक लावून उभी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चौकशी केली असता गाडीत बसलेल्या व्यक्तीने आपण ‘IAS अधिकारी’ असल्याचे सांगितले व बनावट ओळखपत्र दाखवले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने खोटेपणा मान्य केला.
शासकीय यंत्रणांमध्ये थेट प्रवेश
चंद्रमोहनने केंद्रीय गृहविभागाचे बनावट ओळखपत्र, सुरक्षा विभागाचा व्हिजिटिंग कार्ड, आधार कार्ड आणि दोन मोबाईल्स जवळ बाळगले होते. त्याने वापरलेली मोटरगाडी, ज्यावर ‘भारत सरकार’चा फलक होता, ती देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चौकशीत समोर आले की, ती गाडी कांबळे नावाच्या व्यक्तीची असून चालक एका ओळखीच्या माध्यमातून आरोपीला हव्या त्या ठिकाणी घेऊन जात होता.
वाहतूक पोलिसांनाही गंडा
दादर येथे वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवली होती, पण आरोपीने ‘सनदी अधिकारी’ असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवत स्वतःची सुटका करून घेतली. इतकेच नव्हे तर त्याने मुंबईतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा देखील प्रयत्न केल्याचा संशय आहे. या दिशेने पोलिस अधिक तपास करत आहेत.
गंभीर सुरक्षा प्रश्न
हा प्रकार उघडकीस आल्याने शासकीय ठिकाणी बनावट व्यक्तींना प्रवेश मिळणे किती सोपे आहे, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सरकारी गेस्ट हाऊस, वाहतूक पोलिस, सुरक्षा विभाग यांची तपासणी प्रक्रिया किती त्रुटीपूर्ण आहे, हे या प्रकरणातून समोर आले आहे. आरोपीविरोधात विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…