महाराष्ट्र
Trending

राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्यात युतीचे संकेत; महाराष्ट्रासाठी ‘मराठी एकता’चा नवा अध्याय?

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance:  संजय राऊतचा संदेश : ‘मुंबईवर चालणाऱ्या अदाणी आक्रमणाला एकत्र येऊनच थोडगा शकतो’

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेच्या व मराठी माणसाच्या हितासाठी महत्त्वाची राजकीय युती घडण्याच्या संकेतांनी चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे व शिवसेना (ठाकरे) या पक्षांच्या एकत्र येण्याबाबत संकेत दिले आहेत. Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance

राज ठाकरेंच्या या प्रस्तावाला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिला आहे. शिवसेना (ठाकरे)चे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत, “महाराष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही पक्षाबरोबर यायला तयार आहोत. त्यामुळे मनसेला आमचा साद आहे.”

याशिवाय, खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, अंबादास दानवे आणि सुनील प्रभू यांनीही युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. मात्र, मनसेने या चर्चांना अधिक ठोस स्वरूप देण्यासाठी प्रसारमाध्यमांऐवजी थेट चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.

संजय राऊत यांनी या संदर्भात म्हटले आहे की, “मुंबईवर अदाणी आक्रमण करत असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा षडयंत्र रचला जात आहे. या आक्रमणाला थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एकता आवश्यक आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्वतंत्र संघटना उभी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनीही अशीच संघटना उभी केली आहे. या सर्वांनी एकत्र यावे, अन्यथा मुंबई आपल्याकडून दूर जाऊ शकते.”

शिवसेना (ठाकरे) आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये युतीसाठी स्पष्ट आणि निर्मळ भावना असून, महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0