Sambhaji Nagar IAS Scam : पाकिस्तानी संबंधांच्या संशयाखालील महिलेला अटक; खासदारांनी दिली 20 हजार रुपयांसह इतर मदत; नेमके काय घडले?
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगरमधील एका बड्या हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रे वापरून सहा महिने वास्तव्यास असलेल्या आणि पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानमध्ये संबंध असल्याचा संशय असलेल्या कल्पना भागवत नामक महिलेच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे. ही महिला स्वतःला आयएएस अधिकारी असल्याचे सांगत होती आणि तिच्या चौकशीतून मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या महिलेला पैसे देणाऱ्या 11 जणांच्या यादीत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
खासदार आष्टीकर यांनी दिली प्रतिक्रिया
या प्रकरणात नाव आल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे.त्यांनी मान्य केले की त्यांची आणि त्या तोतया अधिकाऱ्याची भेट झाली होती. त्यांच्या चुलत भावाच्या मुलाची या महिलेशी ट्रेनमध्ये भेट झाली होती आणि तिने मंदिराला देणगी देण्याची विनंती केली होती. त्यानंतर ही महिला त्यांच्या गावी येऊन भेटली.
“रामभद्राचर्य महाराज यांची ती शिष्य असल्याचे सांगत होती. मुलाखतीच्यादरम्यान अधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय केला असे तिने मला सांगितले होते. मंदिरासाठी मदत मागितली, बरं मी 20 हजार रुपये सुरुवातीला मदत केली होती, त्यानंतरही मी 2-3 वेळा काही पैसे दिले,” असे त्यांनी सांगितले.
इतर मदत: आई आजारी असल्याचे कारण देऊन तिने दीड लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच, तिचा कोल्हापूर येथे अपघात झाल्याचे एका पुरुषाने फोनवर सांगितल्यावर त्यांनी तिला 10 हजार रुपये दिले होते.
शेवटचा व्यवहार: “29 ऑक्टोबर रोजी मी शेवटचे पैसे पाठवले आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
गुट्टे यांनी सांगितले की, त्यांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला नव्हता, पण गरज आहे म्हणून मदत केली होती. ते म्हणाले, “माझ्या वडिलांपासून मी राजकारणात आहे. मला पद्मश्री वैगेरे का देतील. माझ्याकडे जेवढं असतं तेवढं मी वाटप करत असतो.”
सध्या अटक करण्यात आलेली कल्पना भागवत ही पाकिस्तानमधूनही मोठ्या प्रमाणात पैसा मिळवत होती. तिच्याकडून अनेक धक्कादायक कागदपत्रे आणि मोबाईलमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, तिची कसून चौकशी सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…