क्राईम न्यूजपुणे
Trending

Fake Email Fraud : बनावट ई-मेलद्वारे हिंजवडीतील कंपनीला 1.32 लाखांचा गंडा

Pune Hinjewadi Latest Crime News : पुरवठादार कंपनीचे पैसे पाठवण्यासाठी सायबर चोरट्यांकडून फेक बँक खाते वापरले

पुणे :- हिंजवडी परिसरात कार्यरत असलेल्या एका कंपनीची बनावट ई-मेलद्वारे (Fake Email) फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. कंपनीला साहित्य पुरवणाऱ्या पुरवठादार कंपन्यांचे पैसे पाठवण्यासाठी सायबर चोरट्यांनी बनावट बँक खाते वापरून कंपनीला 1 लाख 32 हजार 650 रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या कंपनीला एक बनावट ई-मेल पाठवला. या मेलमध्ये पुरवठादार कंपनीचे असल्याचे भासवून एका बँक खात्याचा तपशील देण्यात आला. कंपनीला दोन पुरवठादार कंपन्यांचे पैसे याच बनावट खात्यावर पाठवण्यास सांगण्यात आले. Pune Latest Scam News

त्यानुसार, फिर्यादींच्या कंपनीने संबंधित बँक खात्यावर 1 लाख 32 हजार 650 रुपये ऑनलाईन पाठवले. मात्र, काही दिवसांनी ही रक्कम पुरवठादार कंपन्यांना मिळाली नसल्याची बाब उघडकीस आली. ही फसवणूक असल्याचे लक्षात येताच कंपनीच्या वतीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हिंजवडी पोलीस Pune Hinjewadi Police Station या सायबर गुन्ह्याचा Pune Cyber Crime पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0