क्राईम न्यूज

Fake Documents Scam : बनावट शिधापत्रिकांद्वारे शासन आणि रुग्णांची फसवणूक; आंतरराज्य टोळीचा दिंडोशी पोलिसांकडून पर्दाफाश

Mumbai Dindoshi Police Take Action Against Scammer : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रचला होता कट | 343 बनावट शिधापत्रिकांसह सात आरोपींना बेड्या

मुंबई l समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (PM-JAY) गैरफायदा घेण्यासाठी बनावट सरकारी कागदपत्रे तयार करणाऱ्या एका मोठ्या टोळीला दिंडोशी पोलिसांनी Dindoshi Police अटक केली आहे. बनावट शिधापत्रिका, झोपडपट्टी ओळखपत्रे आणि एमएमआरडीएचे वाटप पत्र तयार करून शासन व सामान्य जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 343 बनावट शिधापत्रिका, लॅपटॉप, प्रिंटर आणि नऊ मोबाईल फोन असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. Mumbai Latest Crime News

या गुन्ह्याचा उलगडा 7 फेब्रुवारी 2026 रोजी झाला, जेव्हा दिंडोशी पोलीस ठाण्याच्या एटीसी पथकाने मालाड पूर्व येथील राणी सती मार्गावर गस्त घालत असताना सुजल सत्यनारायण दयाल या 21 वर्षीय तरुणाला संशयास्पदरीत्या ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये बनावट झोपडपट्टी फोटो पास आणि कोऱ्या शिधापत्रिका आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, तिथे बनावट कागदपत्रे तयार करण्याचा कारखानाच सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी तेथून 340 बनावट शिधापत्रिका आणि त्या बनवण्यासाठी लागणारे तांत्रिक साहित्य हस्तगत केले. या धक्कादायक प्रकारानंतर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मुंबईसह मीरा रोड, ठाणे आणि वसई परिसरात शोधमोहीम राबवून या टोळीतील इतर सदस्यांची साखळी उघड केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राकेश भगत सिंग, दिनेशकुमार केसरवाणी, एडवर्ड उर्फ सोनू डिसोजा, मणिशंकर शर्मा, विपीन पांडे आणि विरू गुप्ता यांचा समावेश आहे. हे आरोपी विविध रुग्णालयांमध्ये एजंट म्हणून किंवा कमिशनवर काम करायचे. गरजू रुग्णांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही टोळी बनावट शिधापत्रिका बनवून द्यायची आणि त्या बदल्यात शासनाकडून मिळणाऱ्या निधीवर डल्ला मारायची.

ही यशस्वी कामगिरी उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशिकांत मीना, पोलीस उपायुक्त आणि दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर भोसले आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून या मोठ्या रॅकेटचा छडा लावला. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोठपर्यंत पसरले आहेत आणि यात कोणत्या रुग्णालयांचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

37 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago