Fake Currency Notes : नवी मुंबईत बनावट नोटा छापणाऱ्या बंटी बबलीचा पोलिसांनी केला पर्दाफाश
Navi Mumbai Police Busted Fake Currency Note : नवी मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाची धडक कारवाई बनावट नोटा छापून त्या बाजारात खपण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली आहे
नवी मुंबई :- बनावट नोटा Fake Currency Note छापून त्या बाजारात खपण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबईतील बंटी बबलीला (तरुण जोडप) नवी मुंबई, गुन्हे शाखेच्या Crime Branch आर्थिक गुप्तवार्ता पथकाकडून अटक केली आहे. पोलिसांनी Navi Mumbai Police दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून बनावट नोटा,12 मोबाईलसह एकूण 7 लाख 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बनावट नोटा Navi Mumbai Fake Currency Racket प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महापे एमआयडीसी परिसरातील हॉटेल कुणाल पॅलेस येथील रूम नंबर 109 मध्ये अनेक दिवसांपासून एक जोडपं राहत असल्याचे माहिती मिळाली होती. तसेच, त्यांच्याकडे अनेक मोबाईल,लॅपटॉप, प्रिंटर असे साहित्य असून काहीतरी अवैध आणि संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार करत आहेत अशी माहिती मिळाली होती. Navi Mumbai Crime News
मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवी मुंबई, अमित काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), अजयकुमार लांडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात आर्थिक गुन्हांना प्रतिबंध करण्यासाठी आर्थिक गुप्तवार्ता पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर FIU संशयित विवेक कुमार प्रेमबाबु पीपल याला ताब्यात घेतले त्याच्याकडे असलेल्या लॅपटॉप व मोबाईल फोन विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.त्यामुळे आरोपींवरील संशय पोलिसांना गडद वाटू लागला होता.Navi Mumbai Crime News
पोलिसांनी लॅपटॉपची आणि मोबाईल फोनचा सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर आणि सायबर एक्सपर्ट सुशांत पाटील यांच्या मदतीने त्यांच्या ताब्यातील लॅपटॉप तपासणी केली असता त्यामध्ये 500 नावाचे फोल्डर असून त्या फोल्डरमध्ये पाचशे रुपयांच्या नोटाचे दोन्ही बाजूचे स्कॅन केलेले फोटो दिसून आले. तसेच त्यांच्या आयफोन मध्ये 20, 50, 100,200 आणि 500 असे सर्व नोटांचे दोन्ही बाजूंचे स्कॅन केलेले फोटो दिसून आले होते. पोलिसांनी कौशल्य पूर्वक विचारपूस केले असता आरोपींनी छापलेल्या नोटा गाडीमध्ये ठेवलेले सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीचे हॅन्डबॅग जवळ पाचशे रुपयाचे आणि शंभर रुपयाचे बनावट नोटा आढळून आल्या. तसेच गाडीच्या मागील सीटवर स्कॅनर प्रिंटर आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांना आढळून आले आहे. आरोपींकडून पोलिसांना पाचशे रुपयांच्या 181 बनावट नोटा तर शंभर रुपयाच्या 20 बनावट नोटा आढळून आले आहे. तसेच आरोपींकडे 12 मोबाईल, एक टॅब,एक लॅपटॉप,प्रिंटर आणि इतर साहित्य असा एकूण सात लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.आरोपी विरुध्द रबाळे एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 180,181,3(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास पावरा करीत आहेत. आरोपींला न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. Navi Mumbai Crime News
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
1) विवेककुमार प्रेमबाबु पिपल (35 वर्ष) रा. नवीन पनवेल, सेक्टर 10, पनवेल
2) अश्विनी विश्वनाथ सरोवदे, (36 वर्ष) रा. सुरत, राज्य गुजरात.
पोलीस पथक
सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, भाऊसाहेब ढोले यांचे मार्गदर्शनाखाली आर्थिक गुप्तवार्ता पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश जाधव, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार महिला पोलीस हवालदार घनवट, पोलीस शिपाई वंजारी ,कदम तसेच आर्थिक गुन्हे शाखा-2 पोलीस हवालदार राठोड , महिला पोलीस हवालदार आंब्रे यांनी केली असुन त्यांना सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु अलदार, पोलीस उपनिरीक्षक रोहीत बंडगर, सायबर एक्सपर्ट सुशांत पाटील, नवी मुंबई यांनी तांत्रिक तपासणीकामी आवश्यक मदत केली आहे.