Fahad Ahmed : स्वरा भास्करचे पती राज्याच्या विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार का?
•Swara Bhaskar Husband Fahad Ahmed Will Contest Elections 2024 सपा युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद यांच्या मते, गांधी ही एक कल्पना आणि विश्वास आहे की सत्यापेक्षा मोठी शक्ती नाही. सत्याची सर्वात मोठी शक्ती अहिंसा आहे.
मुंबई :- विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आधीच शिगेला पोहोचल्या आहेत. या वेळी सत्ताधारी आघाडीला निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग महाविकास आघाडीमध्ये समावेश असलेल्या पक्षांचे नेत्यांनी बांधला आहेत.दरम्यान, महाराष्ट्र समाजवादी पार्टी युवाजन सभेचे प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद यांनी एक्सवर पोस्ट करून आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
गांधी जयंतीनिमित्त एका एक्स पोस्टमध्ये फहाद अहमद यांनी लिहिले की, “राष्ट्रपिता गांधी हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ते एक कल्पना आहेत, सत्यापेक्षा मोठी शक्ती नाही.सत्यासाठी उभे राहण्याचे धैर्य आणि सत्यासाठी लढण्याची निर्भयता आणि सत्याची सर्वात मोठी नैतिक शक्ती ही अहिंसा आहे.”त्यांच्या एक्स पोस्टनंतर चर्चा सुरू आहे की फहाद अहमद महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार आहेत का? निवडणूक लढवायची असेल तर कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार?
कोण आहे फहाद अहमद?
सपा नेते फहाद अहमद हे बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहेत. देशभरातील सीएए विरोधी आंदोलनांमध्ये ते प्रमुख चेहरा होते.SC-ST विद्यार्थ्यांना आर्थिक मदत काढून घेण्याच्या संस्थेच्या निर्णयाविरोधात 100 दिवसांच्या संपात सहभागी झाल्यानंतर फहादला TISS द्वारे पीएचडी नोंदणी नाकारण्यात आली होती.
सपा नेते अबू आझमी म्हणाले होते की, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता महाविकास आघाडी (MVA) आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.एमव्हीए महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक जोरदारपणे लढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
सपा नेते अबू आझमी म्हणाले, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीने (एमव्हीए) जोरदारपणे निवडणूक लढवली पाहिजे. कमी किंवा जास्त जागा द्याव्यात यावर मतभेद नसावेत. देश मोठा आहे, पक्ष मोठा नाही.