मुंबई

Esha Deol : धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा! ईशा देओलकडून सत्य समोर

Dharmendra Health Condition Update : “वडिलांची प्रकृती स्थिर, काळजी करू नका” – ईशा देओलनं इन्स्टाग्रामवर दिली माहिती

मुंबई :- ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक बातम्या येत असताना, त्यांच्या निधनाबद्दलची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. ही अफवा पसरताच देओल कुटुंबियांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर, धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिने या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

ईशा देओलनं आज इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

“वडिलांचं (धर्मेंद्र) निधन झालेलं नाही, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही,” असं तिने स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून, त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित आहेत.ईशा देओलने दिलेल्या या अपडेटमुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0