पनवेल तक्का येथे अतिक्रमणाचा दणका: किंग्स इलेक्ट्रॉनिक समोर पालिकेच्या जागेवर अण्णा भगत यांचा भंगारवाला आणि पान टपरीचा धंदा!

पनवेल : पनवेल तक्का येथील किंग्स इलेक्ट्रॉनिकच्या समोर पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर अण्णा भगत याने बेकायदा अतिक्रमण करून भंगारवाला आणि पान टपरीच्या नावाखाली भाडे वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बेकायदा धंद्याने परिसरात अस्वच्छता आणि गोंधळ वाढला असून, स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

युवा ग्रामीण पत्रकार संघ, पनवेल तालुका अध्यक्षांनी याबाबत तीव्र निषेध व्यक्त करत पालिका प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे. “पालिकेच्या जागेवर बेकायदा भाडे वसूल करणाऱ्या अण्णा भगत याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. पालिकेच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या अतिक्रमणाच्या नाट्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकारामुळे परिसरातील वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही पालिका अधिकाऱ्यांचे मौन आणि निष्क्रियता नागरिकांना चक्रावून टाकणारी आहे. आता प्रशासन कधी जागे होणार आणि अण्णा भगत याच्यावर कारवाई करणार, याकडे संपूर्ण पनवेलचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

40 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago