एन्काऊंटर स्पेशल! सराईत गुंड शाहरुख शेखला गोळ्या झाडणाऱ्या पोलिसांना एक लाखांचं बक्षीस!

Pune Police Encounter Wanted Gangster : आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून युनिट 6 च्या पथकाचं कौतुक; ‘शौर्य बक्षीस’ जाहीर
पुणे | पुण्यातील कुख्यात सराईत गुंड शाहरुख शेख उर्फ अट्टी याच्या गुन्हेगारी कारवायांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सोलापूरमधील लांबोटी येथे पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 6 Pune Crime Unit 6 पथकाने भल्या पहाटे त्याचा एन्काऊंटर केला. या धडक कारवाईनंतर आता पोलिस दलात आनंदाचे वातावरण असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar यांनी धाडसी पथकासाठी थेट 1 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. Pune Breaking News
केवळ 23 वर्षांच्या शाहरुखवर खून, दरोडा, गोळीबार यांसारखे तब्बल 15 गंभीर गुन्हे दाखल होते. इतकंच नव्हे तर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. पोलिसांचा ससेमिरा लागल्याने तो काही दिवसांपासून सोलापुरात नातेवाईकांकडे लपून बसला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून शाहरुखच्या अड्ड्यावर छापा टाकत थेट कारवाई केली.
या वेळी शाहरुखने पळून जाण्याचा आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. या गोळीबारात शाहरुखला चार गोळ्या लागल्या. त्याला तात्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या शौर्यदालनाच्या प्रत्ययासह, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलिसांची ही कारवाई राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. आयुक्त कुमार यांनी “हे पोलिस दलाचं शौर्य असून कायद्यासमोर गुन्हेगार कोणताही मोठा नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे,” असं सांगत आपल्या जवानांना बक्षिस देत गौरवलं.



