Air India,Air India emergency landing,Air India news,Air India emergency landing thailand,Air India delhi phuket flight,Flight AI 379
Emergency Landing : फुकेत विमानतळावर आकस्मिकता योजना सक्रीय; सुरक्षा यंत्रणांची तत्पर कार्यवाही
ANI :- थायलंडमधील फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया फ्लाइट AI-379 ने शनिवारी आपत्कालीन लँडिंग केलं. या विमानात 156 प्रवासी होते. दिल्लीकडे येणाऱ्या या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट ‘फ्लायट्रेडर24’च्या नोंदीप्रमाणे हे विमान भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता फुकेतहून दिल्लीसाठी रवाना झालं होतं. परंतु उड्डाणानंतर काही वेळातच अंदमान समुद्रावर एक मोठं वर्तुळ घालत ते पुन्हा फुकेतमध्ये उतरवलं गेलं.
‘नेशन थायलंड’च्या अहवालानुसार, धमकी मिळताच विमानतळ प्रशासनाने आकस्मिकता योजना (Airport Contingency Plan – ACP) तात्काळ अमलात आणली. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून, सुरक्षा तपासणी सुरु आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू असून, धमकी खरी होती की खोटी, याचा शोध घेतला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंत्रणांची तत्परता कौतुकास्पद ठरली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…