
ST bus strike :आर्थिक आणि खाजगीकरणाच्या अशा विविध मागण्यांकरिता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभरात बेमुदत संप पुकारला आहे
मुंबई :- राज्यात गणेश उत्सवाला काही दिवसच शिल्लक राहिले असताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ST bus Employee Strike बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी सेवा पूर्णपणे कोलमडले असून एसटी कर्मचाऱ्यांनी लाल परीला ब्रेक लावला आहे. खाजगीकरण आणि आर्थिक नियोजन असे विविध मागण्यांकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे.एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार राज्यातील विविध आगारांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
राज्यातील 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलन पुकारले असल्याने 3 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारांपैकी 35 आगार पूर्णतः बंद आहेत. इतर आगारांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः काम सुरू आहे. मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. त्यामुळे येथील वाहतूक खंडित झालेली नाही. परंतु, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहेत.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळायला पाहिजे, प्रलंबित महागाई भत्ता व फरक, वाढीव घरभाडे भत्ता व फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या 5,000,4,000,2500 ऐवजी सरसकट पाच हजार मिळावेत, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
काय मागण्या आहे
- 1.खाजगीकरण बंद करा.
- 2.सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा.
- 3.इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा.
- 4.जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा.
- 5.चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचा-यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या
- 6.वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.
- 7.सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी..
- 8.विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या.
या सर्व मागण्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच लागू करावे कारण की काही दिवसातच राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा परिस्थितीत मागण्या पुन्हा एकदा रखडणार असून कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे