Sandip Deshpande Target Milind Devora : राजकुमाराला माश्यांच्या सुगंध ही सहन होत….. संदीप देशपांडे यांचे ट्वीट
मुंबई :– राज्यात विधानसभेच्या निवडणुकांच्या Elections 2024 तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराची धुमाळी जोरात होऊ लागली आहे. यंदाच्या निवडणूक तिरंगी होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि मनसेचा सामना यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदार संघात उमेदवार एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोच्या मालिका चालू आहे. यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत हॉट सीट ठरलेली माहीम आणि वरळी विधानसभेची जागा यावरून अनेक राजकीय रंग चढले असतानाच वरळी विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार संदीप देशपांडे Sandip Deshpande यांनी नाव न घेता मिलिंद देवरा Milind Devora आणि आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांच्यावर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वरळी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचा विजय झाला होता. आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री म्हणूनही कारभार पाहिला होता. यंदाची वरळी विधानसभेची निवडणूक तिरंगी होणार असून यामध्ये शिंदे गटाकडून राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा तसेच शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे संदीप देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता एक ट्विट करत विरोधकांवर टीका केली आहे. मिलिंद देवरा यांच्यावर टीका करताना संदीप देशपांडे म्हणाले की ज्या मलबारीलच्या राजकुमाराला माश्यांच्या सुगंधही सहन होत नाही तो म्हणतो मी कोळीवाड्याचा विकास करणार? संदीप देशपांडे यांच्या ट्विट मधून मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यक्रमाच्या सोहळ्या दरम्यान मिलिंद देवरा यांनी वरळीतील प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेऊन येथील कोळी बांधवांना न्याय मिळवून देणारा असल्याचे बोलले होते. त्याच्या अनुषंगाने देशपांडे यांनी ट्विट केले आहे असे म्हटले जाते.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…