मुंबई

Election Update : राज्यातील 3 प्रभागांतील निवडणुकीला तात्पुरता ‘ब्रेक’! – उमेदवारांच्या निधनामुळे मनमाड, पिंपळनेर आणि गेवराई येथील नगरसेवक पदाच्या निवडणुका स्थगित

•आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावरही लक्ष; अध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती नाही, 2 डिसेंबरला मतदान कायम

मुंबई :- राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांना (Maharashtra Election) तात्पुरता ब्रेक लागला आहे. राज्य निवडणूक आयोगाने तीन प्रभागांमधील निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यानंतर नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

या तीन ठिकाणी निवडणूक स्थगित
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ज्या तीन प्रभागांमधील निवडणूक थांबवण्याचे आदेश दिले आहेत, त्यांची माहिती खालीलप्रमाणे:

1.मनमाड, नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन झाल्याने या ठिकाणची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

2.पिंपळनेर, धुळे: धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील प्रभाग क्रमांक 2 ब मधील भाजपच्या उमेदवार कुसुमबाई पाथरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

3.गेवराई, बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार दूरदानाबेगम सलीम फारुकी यांचे निधन झाल्याने या ठिकाणच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे.
या प्रभागांमध्ये केवळ नगरसेवक पदासाठीची निवडणूक थांबवण्यात आली असून, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीस मात्र कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही.

आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावर लक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. निवडणुकीसाठी निवडणूक चिन्ह वाटप आणि प्रचार अंतिम टप्प्यात असताना हा निर्णय आला आहे. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण मर्यादा ओलांडल्याविषयी फैसला येण्याची शक्यता आहे. आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यासंदर्भात आज निकाल येण्याची शक्यता असल्याने, अनेक राजकीय जाणकार या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवत आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

53 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago