महाराष्ट्र

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

विधान परिषदेच्या पाच सदस्यांचा जागा रिक्त झालेल्या आहेत.

मुंबई :- राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. तसेच, केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेवर रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आले आहे. 27 मार्चला मतदान होणार असून 10 ते 17 मार्च दरम्यान अर्ज भरण्याची तारीख असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

आमश्या पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कनाड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, या रिक्त जागांवर निवडणुका घेण्यात येत आहे. आमदार आमश्या पाडवी यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2028 पर्यंत आहे. तर, राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत आह. भाजप नेते आणि आमदार प्रवीण दटके यांचा कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत असून आमदार रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचाही कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे सर्व आमदार विजयी झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर याच महिन्यात निवडणूक होणार आहे.तसेच,कुणाची नेमणूक होणार याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

विधान परिषद पाच जागांकरिता निवडणूक कार्यक्रम?

  • 10 मार्च ते 17 मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया
  • अर्जाची छाननी 18 मार्च रोजी होणार
  • 20 तारखेला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
  • 27 तारखेला विधान परिषद जागांसाठी मतदान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0