ठाणेमुंबई
Trending

Election Commision : निवडणुका जाहीर करण्यापूर्वीच ‘मनसे-मविआ’ आक्रमक; पुन्हा घेतली निवडणूक आयोगाची भेट

MVA On Maharashtra Election : ‘मतदार यादीतील घोळ संपेपर्यंत निवडणूक नको’; विरोधकांकडून 9 मुद्द्यांचे पत्र सादर, आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद नाही

मुंबई :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत जाहीर होण्याची शक्यता असतानाच, त्यापूर्वी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शिष्टमंडळाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. मतदार याद्यांमधील मोठ्या घोळावर आक्षेप घेत, हा घोळ दूर होईपर्यंत निवडणुका जाहीर करू नयेत, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने निवडणूक आयोगाला नऊ मुद्द्यांचे पत्र देण्यात आले आहे. त्यांची प्रमुख भूमिका आहे की, मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे आणि जोपर्यंत हा घोळ संपत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. या पार्श्वभूमीवर आज शिष्टमंडळाने आयोगाची भेट घेऊन मतदार याद्यांमधील घोटाळ्याबाबत जवळपास अर्धातास चर्चा केली.

या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले की, “आम्ही आज पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे आणि निवडणुका जाहीर व्हायला नकोत म्हणून विनंती केली आहे. जर मतदार याद्या दोषपूर्ण असतील तर निवडणूक घेण्याला काय अर्थ आहे? निवडणूक लगेचच जाहीर होऊ नये, यासाठी देखील पत्र देण्यात आले आहे.”

या भेटीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, मतदार यादीमधील घोळ जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत मतदान घेऊ नका, अशी आमची मागणी आहे. बोगस मतदारांची नावं यादीतून काढावीत, अशी आमची मागणी आहे. नांदगावकर म्हणाले की, या भेटीनंतर आमचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. “एकीकडे आई जेऊ घालेणा अन् बाप भीक मागू देईल अशी परिस्थिती आहे. दबावाखाली काम सुरू आहे, असं आमच्या निदर्शनास आलं आहे. निवडणूक आयोगानं आम्हाला कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही,” असे गंभीर आरोप नांदगावकर यांनी केले आहेत.

आता 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग विरोधकांच्या या मागणीची दखल घेऊन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0