महाराष्ट्रमुंबई

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या सत्काराला ठाकरेचे खासदार उपस्थित,”ऑपरेशन टायगर”?

Maharashtra Political Latest News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांची उपस्थिती

मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या दिल्लीत मंगळवारी शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार देऊ सत्कार करण्यात आला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कामाबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मंडळाले शरद पवार यांच्या हस्ते सत्कार केला. या सत्काराला ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील Sanjay Dina Patil हे देखील उपस्थित होते. त्यामुळे संजय दिना पाटील शिंदे गटात जाणार का अशा चर्चांना उधाण आहे.

खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्या बाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी संजय दिना पाटील यांचा फोटो पोस्ट करत संजय राऊत त्यांना प्रश्न विचारले आहे की आता तुम्ही यावर काय बोलणार? एकीकडे ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यावर टीका होत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून शरद पवारांची बाजू घेतली जात आहे. परंतु, आता ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे यावरून आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, संजय दिना पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांची शरद पवार यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळेच ते या कार्यक्रमाला गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. तर आपल्याला या सोहळ्याचे निमंत्रण होते. सर्वपक्षीय नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम असल्याने आपण तिथे गेलो होतो, अशी प्रतिक्रिया संजय दिना पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0