Eknath Shinde : ठाकरे गटाला मोठा खिंडार, हिंगोली सह पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते शिंदे गटात
Hingoli And Palghar Uddhav Group Politician Join Eknath Shinde Group : माजी राज्यमंत्री आणि माजी नगरसेविका यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी शिंदे यांच्या सेनेत
मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray गटाच्या महत्त्वाचे नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. एकाच दिवशी हिंगोली Hingoli आणि पालघर Palghar जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी शिंदे Shinde Group सेनेमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभेच्या दोन्ही सेनेला आलेल्या यशानंतर दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग चालू आहे. काही महिन्यांवर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे पक्ष प्रवेश करणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही पक्ष आता राज्यात अतिशय महत्त्वाच्या स्थानी असून दोन्ही पक्षांना आलेले यश पाहता यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर चढा ओढ होणार आहे.
माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.गेल्या काही वर्षांपासून पक्षात डावलले गेल्याने तसेच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे न जाणून घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उबाठा सेनेची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तसेच,मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तारा घरत आणि युवासेनेच्या जिल्हाधिकारी पवनतारा घरत यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासह स्वप्नील नवले, स्वप्नील शिर्के, धर्मेंद्र सिंह, मयूर म्हात्रे, तुषार पाटील, समीर पाटील, अजय मोहन, विपीन घरत, नम्रता घरत, सचिन घरत, जय म्हात्रे, दिलीप पाटील, कल्पना पाटील, शिला भालसिंह यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Web Title : Eknath Shinde: Thackeray group has a big problem, important leaders of Palghar district along with Hingoli are in Shinde group