Eknath Shinde On Uddhav Raj : ठाकरे-राज मेळाव्यानंतर शिंदेंच्या ट्विटरवर काव्यात्मक टोले
मुंबई | हिंदी भाषा सक्तीचा शासकीय आदेश रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडलेला शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचा संयुक्त विजयी मेळावा केवळ भाषिक अभिमानाचे नव्हे, तर राजकीय सत्तासंवादाचे नवे प्रस्थानबिंदू ठरलेला दिसतो आहे.
या मेळाव्याचा उत्साह ओसरत नाही तोच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका कवितेसदृश ट्विटने राजकीय चर्चांना नवे परिमाण दिले आहे.
“एक मराठीप्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी,
एकाचा मराठीचा वसा, दुसरा भरतोय खिसा,
एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा,
एक धाकला असून थोरला, दुसरा थोरला असून धाकला.”
या ओळींनी स्पष्टपणे इशारा कोणावर आहे आणि कौतुक कोणाचे, यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एका भावावर स्तुतीसुमने, तर दुसऱ्यावर टीकेची धार असल्याने, शिंदेंच्या या काव्यात्मक प्रतिक्रियेमुळे ठाकरे-राज जवळ येणं काहींना अस्वस्थ करणारे ठरत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
ट्विटर अकाऊंटवरील काव्य नेमके काय ?
या काव्यात ‘एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक’, ‘एक उजवा, दुसरा डावा’, ‘एक धाकला असून थोरला, दुसरा थोरला असून धाकला’, ‘एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी’, ‘एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड !’, ‘एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता’, ‘एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा’, ‘एकाचा मराठीचा वसा, दुसरा भरतोय खिसा’, ‘एकाचा स्वतंत्र सवतासुभा, दुसरा नुसताच आयतोबा’ असे शब्द खेळ करत कौतुकासहित खणखणीत टिका केल्याचे दिसून आले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…