Eknath Shinde : “माझी माती माझी माणसं.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावातील आजींशी साधला संवाद

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर गावातील आजीसोबत चे फोटो शेअर केले
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर सातारा जिल्ह्यातील दरे गावातील आजींसोबत साधलेल्या संवादाचे फोटो शेअर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल साताराहून पुणे येथे हेलिकॉप्टरने जात असताना हेलिकॉप्टर चे नियंत्रण बिघडल्याने होते. एकनाथ शिंदे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक सुद्धा उपस्थित होते. परंतु कोणताही अनार्थ घडला नाही आणि नंतर एकनाथ शिंदे आपल्या गाडीने पुण्याकडे निघाले त्यादरम्यानच त्यांना गावातील आजीन सोबत भेटीगाठी झाल्या त्यावेळी त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात जमा झाले का असे विचारपूस केली. राज्यात निवडणुकीची लगबग सुरू आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आपापले उमेदवार देण्यासाठी व्यस्त असताना राज्यातील मुख्यमंत्री मागील एक ते दोन दिवसाकरिता आपल्या मूळ गावी गेले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोशल मीडियावर म्हणाले की,माझी माती, माझी माणसं…
राजकारणाच्या धकाधकीतून वेळ काढत काही क्षण निवांत घालवण्यासाठी माझे मूळ गाव असलेल्या #सातारा जिल्ह्यातील दरे गावात गेलो होतो. गावाहून निघत असताना काही महिलांनी माझा ताफा थांबवला. माझ्याच गावात राहणाऱ्या या माय माऊलींचे माझ्या आईशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते पण मी त्यांना ओळखेन की नाही अशी शंका त्यांना क्षणभर जाणवली, मात्र मी या सर्व माय माऊलींना ओळखले असल्याचे सांगत त्यांच्याशी संवाद साधला.
क्षणाचाही विचार न करता या माय माऊलींनी माझ्या जवळ येऊन आस्थेने माझी विचारपूस केली. त्यांचा वयाचा मान राहून मी देखील पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळाले की नाही तेही आवर्जून विचारले. यावर सर्वांनी होकारार्थी माना हलवत हातात औक्षणाचे ताट घेऊन मला मायेने ओवाळले. आपल्या थरथरत्या उबदार हातांनी मला भरभरून आशीर्वाद दिले, तसेच राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार यायला हवे, असे मला आवर्जून बजावले.
माझ्यावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या राज्यातील लाखो माता-भगिनी, सर्व लाडक्या बहिणी हीच माझी खरी संपत्ती आहे. त्यांचे आशीर्वाद जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला काहीही होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.