Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या कौशल्य हॉस्पिटल मध्ये जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या बहिणीच्या तब्येतीची केली विचारपूस
ठाणे :- धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यातील नाते हे जग जाहीर आहे. धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या मृत्यूनंतर ठाण्याचे पालकत्व एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर बाळासाहेबांनी ठाण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवली आणि त्यानंतर ठाणे जिल्हयाचे नेतृत्व गेल्या कित्येक दक्षकापासून एकनाथ शिंदे करत आहे. शिवसेना आणि राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांचे जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतेच राज्याच्या पाचवे टप्प्यातील मतदान संपन्न झाले असून एकनाथ शिंदे यांचा पुन्हा राजकीय कामातून सामाजिक कार्यात आणि मुख्यमंत्री पदाचे सर्व जबाबदारी स्वीकारून पुन्हा एकदा राज्या विकासाकरिता काम करत असताना धर्मवीर आनंद दिघे यांची ज्येष्ठ बहीण अरुणाताई गडकरी यांची ठाण्यातील कौशल्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.\
काही दिवसांपासून अरुणाताईंची (Arunatai Gadkari) तब्येत बरी नसल्याने त्यांना कौशल्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस व त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून अरुणाताईवर कशाप्रकारे उपचार चालू आहे याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.