• ‘लाडकी बहीण’ योजना कायम, सुनांच्या न्यायासाठी शाखा ठरतील माहेरघर
मुंबई | “देश जिंकला, महाराष्ट्र जिंकला, आता मुंबई महापालिका जिंकून भगव्याची हॅट्ट्रिक पूर्ण करूया,” असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीतील वर्धापन दिन मेळाव्यात व्यक्त केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवताना, त्यांचा ‘अहंकार’ विधानसभेत ठेचून काढल्याचे ठामपणे सांगितले.
या मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे यांनी सांगितले की, समोरच्या गटातील 84 पैकी 50 नगरसेवक आता शिंदे गटात दाखल झाले आहेत, तसेच इतर पक्षांतील 15 नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. “मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली असून, या निवडणुकीत विजय निश्चित आहे,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
“हे लोक पाकिस्तानच्या झेंड्यांना आश्रय देतात, दहशतवाद्यांच्या कबरी सजवतात, हिंदुत्वविरोधकांशी हातमिळवणी करतात, आणि हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकतात,” अशी सडकून टीका करत शिंदे यांनी मुंबईतील मराठी माणसांच्या समस्यांसाठी ठाकरे गटाला जबाबदार धरले.
कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत, महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना अधिक व्यापक रूपात सुरू राहील असे शिंदे यांनी सांगितले. “शिवसेना शाखा म्हणजे सुनांचं माहेरघर असून, कोणतीही अघोषित अन्यायाची घटना झाली तर न्याय दिला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…