क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Samta Nagar Police : ‘लेडीज पर्स’चा काळ जेरबंद! बेस्ट बसमधून महिलांना लक्ष्य करणारा अट्टल चोर गजाआड

Kandivali SamtaNagar Police Caught Robbers : समतानगर पोलिसांकडून 48 तासांत मास्टरमाईंडला अटक; 1 लाखाचे मंगळसूत्र आणि दागिने हस्तगत

मुंबई :- मुंबईतील ‘बेस्ट’ बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्समधून दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या एका सराईत आणि अट्टल गुन्हेगाराला समतानगर पोलिसांनी Kandivali Samta Nagar Police अवघ्या 48 तासांत अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे महिला प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी गुलअफशा शफिक शेख या गृहिणी गोरेगाव ते महिंद्रा कंपनी गेट असा बेस्ट बसमधून प्रवास करत असताना, त्यांच्या पर्समधून दोन सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1.05 लाख किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तांत्रिक आणि पारंपरिक तपास पद्धतीचा अवलंब करत आरोपीचा शोध सुरू केला.

पोलिसांनी आप्पापाडा, मालाड पूर्व येथील रहिवासी असलेल्या सुरेश बाबू पवार (वय 50) या अट्टल आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. तपासामध्ये, चोरी गेलेल्या मालमत्तेपैकी 10 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याची मंगळसूत्र आणि दोन जोडवी असा एकूण 1 लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक आरोपी सुरेश पवार हा सराईत असून, त्याच्यावर अशाच प्रकारचे 10 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक अजितसिंग राजपूत आणि त्यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0