Eknath Shinde In Thane : ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक नंबर
•ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील चार लोकसभेच्या जागे पैकी दोन जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आघाडीवर, भाजपाला एक जागेवर केंद्रीय मंत्र्यांच्या पराभव
ठाणे :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा बालेकिल्ला राखणार आहे. ठाणे जिल्हा त्यामध्ये ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभा, पालघर लोकसभा या तिन्ही जागेवर या तिन्ही जागेवर शिंदे यांचे उमेदवारी एक नंबर वर असून त्यांचा विजय झाला आहे. ठाणे,कल्याण,पालघर या तीन लोकसभा मतदार संघामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे असा लोकसभेचा सामना रंगला होता. ठाणे मध्ये ठाकरे कडून एकनिष्ठ असलेले राजन विचारे यांच्या विरोधात शिंदे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे बंडाच्या पहिल्या दिवसापासून त्यांचे साथीदार असलेले नरेश म्हस्के यांच्या मोठा मताधिक्क्याने विजय झाला आहे.
कल्याण मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळून ठाकरे गटाच्या दरेकर यांचा पराभव केला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव असलेला मतदारसंघ असून येथे तिरंगी लढत पाहायला मिळाली. पालघरमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत.
पालघर मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे डॉ. हेमंत सावरा तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते.