मुंबई

Eknath Shinde : ठाकरे गटातील चार माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल — एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन

Eknath Shinde Latest News : माजी सभापती, महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश; नाशिकमध्ये शिंदे गट मजबूत

मुंबई | नाशिक महानगरपालिकेतील Nashik BMC ठाकरे गटाचे चार माजी नगरसेवक आणि त्यांचे प्रमुख कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि हस्ते आज शिवसेना पक्षात दाखल झाले. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये युवती सेनेच्या उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविका किरण बाळा दराडे, माजी महिला व बालकल्याण सभापती सीमा गोकुळ नगळ, माजी सभापती पुंडलिक अरिंगळे, माजी नगरसेवक पुनजाराम गामणे यांचा समावेश होता. याशिवाय इतर पदाधिकारी व शेकडो कार्यकर्तेही पक्षात सहभागी झाले.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार घेऊन काम करणाऱ्या आमच्या शिवसेनेत नव्या दमाचे कार्यकर्ते येत आहेत, ही आमच्यासाठी शक्तीवृद्धी आहे. धनुष्यबाण हेच आपले खरे बळ आहे आणि तेच चिन्ह घेऊनच शिवसेना पुन्हा जनतेच्या मनात आपली जागा बळकट करेल.”

एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं, “जनतेने आम्हाला 2022 मध्ये आशीर्वाद दिला, तेव्हापासून आम्ही कामात गुंतलोय. विरोधक फक्त आरोप करत राहिले, पण काम करणाऱ्यांच्याच पाठीशी जनता उभी आहे.”

या प्रसंगी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना सचिव राम रेपाळे, संजय मोरे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

vivek

Recent Posts