Eknath Shinde Call Sanjay Raut : महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कायम! उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार सुनील राऊत यांच्याशी साधला संवाद
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणाला एक अलौकिक परंपरा लाभली आहे. राजकीय प्रतिस्पर्धी किंवा विरोधक असले तरी, वेळप्रसंगी वैयक्तिक संबंध जपणारे नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातील नातं याचे उत्तम उदाहरण आहे. आजच्या काळातही ही राजकीय संस्कृती कायम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची फोनवरून तब्येतीची विचारपूस करत या संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.
संजय राऊत यांची प्रकृती काही दिवसांपासून बिघडली आहे. नुकतेच त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता त्यांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून राऊत यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या होत्या.
आता याच माणुसकीच्या नात्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांच्याशी संपर्क साधला. एकनाथ शिंदे यांनी थेट संजय राऊत यांचे भाऊ, आमदार सुनील राऊत यांना फोन केला आणि संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोघांमधील या फोनवरील संभाषणाचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. शिंदे यांनी संजय राऊत यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…