मुंबई

Eknath Shinde & Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “नगर विकास” विभागावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करडी नजर

Eknath Shinde & Devendra Fadnavis: नगरविकास खात्यातील मोठ्या निधी वाटपासाठी आता फडणवीसांची मंजुरी अनिवार्य, शिंदेंच्या मोकाट खर्चावर अंकुश

मुंबई :- राज्यातील महायुती सरकारच्या अंतर्गत कुरघोडी आणि निधीवाटपातील पक्षीय पक्षपातीपणावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट लक्ष घातले आहे. Eknath Shinde & Devendra Fadnavis विशेषतः नगरविकास खात्याच्या निधीवाटपावर आता मुख्यमंत्री कार्यालयाची नजर राहणार असून, कोणताही मोठा निधी वितरीत करताना मुख्यमंत्री फडणवीस यांची मंजुरी आवश्यक असणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या मोकाट कारभाराला चाप बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अलीकडच्या काळात केवळ शिंदे गटाच्या आमदार-नगरसेवकांना निधी देण्यात आल्याच्या तक्रारी जोर धरू लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हस्तक्षेप करत सर्व जिल्ह्यांना समप्रमाणात निधी मिळतोय का, हे पाहण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. सत्तेत असलेल्या मित्रपक्षांकडून निधीवाटपात पक्षपात होत असल्याच्या तक्रारी आधीपासूनच होत्या. शिंदे गटाकडून बाहेरून येणाऱ्या नगरसेवकांना सढळ हस्ते निधी वाटला जाऊ नये, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने आता नियामक भूमिका घेतली आहे.

या निर्णयामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, फडणवीसांच्या या धोरणामुळे महायुतीतील समन्वय आणि पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे संकेत आहेत. पुढील काळात या निधीवाटप धोरणाचे राजकीय पडसाद कसे उमटतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago