Eknath Shinde Latest News: संजय निरुपम यांच्या पुढाकाराने अभ्यासिका, प्रशिक्षण केंद्र आणि कुस्ती आखाड्याचे लोकार्पण
मुंबई :- शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम Sanjay Nirupam यांच्या पुढाकाराने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत तीन महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका धर्मवीर आनंद दिघे सरकारी नोकरी प्रशिक्षण केंद्र, आणि अण्णाभाऊ साठे क्रीडा संकुलातील लाल मातीचा कुस्ती आखाडा या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी बोलताना निरुपम म्हणाले, “शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही स्थानिक पातळीवर शिक्षण, रोजगार व खेळ क्षेत्रात भरीव पावले उचलत आहोत. अभ्यासासाठी घरात जागा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि तरुणांसाठी सरकारी नोकरीसाठीचे प्रशिक्षण केंद्र ही काळाची गरज आहे.”
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या क्लस्टर विकास योजनेचा आणि महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मासिक 1500 च्या सन्मान योजनेचाही यावेळी उल्लेख करण्यात आला. मुख्यमंत्री कार्यकाळात गडचिरोलीत टाटा कंपनीच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या यशस्वीतेनंतर, कल्याण व पुण्यातही अशी केंद्रे सुरू करण्याची योजना आहे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू झालेली अभ्यासिका हे त्यांचे आशीर्वादस्थान ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात संजय मोरे यांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच जाहीर केलेल्या गृहनिर्माण धोरणात क्लस्टर पद्धतीने झोपडपट्ट्यांचे पुनर्विकसन करून मुंबईबाहेर गेलेल्या रहिवाशांना पुन्हा शहरात आणण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती देण्यात आली. तसेच, कल्याण व पुणे येथे नवीन कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमात खासदार रवींद्र वायकर, आमदार मुरजी पटेल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, संपर्कप्रमुख उदय सावंत, विभागप्रमुख स्वप्नील टेम्ब्युलकर, व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका साधनाताई माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. त्यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत दाखल होऊन पक्षाला बळ दिले.
संजय निरुपम यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले की, “शिवसेना हा सर्वसामान्यांसाठी लढणारा पक्ष आहे. मात्र, देशविरोधी विचारसरणीला क्षमा नाही.” देशभरात होत असलेल्या दहशतवादी घटनांविरोधात शिवसेना नेहमीच पहिल्या रांगेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…