Eknath Shinde Visit Mithi River Side Area : मिठी नदी आणि दरडप्रवण परिसराचा घेतला आढावा; आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश
मुंबई :- गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या दोन्ही शहरांतील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी मुंबईतील मिठी नदीचा तसेच विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण भागाचा आढावा घेतला.
मुंबईत आपत्ती व्यवस्थापन सज्ज
वांद्रे येथील मिठी नदीच्या परिसराची पाहणी केल्यानंतर शिंदे यांनी सांगितले की, मिठी नदीकाठच्या भागात एनडीआरएफची पथके आणि बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रशासनाला आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी विक्रोळी पार्कसाईट येथे दरड कोसळली होती. आज त्यांनी या परिसराचीही पाहणी केली.
ठाण्यात पाणी निचरा करण्याचे आदेश
मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पावसाचा जोर वाढला असून, शहरात 225 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नौपाडा आणि कोपरीत सखल भागांत पाणी साचले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना तातडीने पंप लावून पाणी बाहेर काढण्याचे निर्देश दिले.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…