Eknath Shinde : धारावीत एक लाखाहून अधिक झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरूपी घरे मिळतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Eknath Shinde on Dharavi Home project: गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावी प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे. धारावीत एक लाखाहून अधिक लोकांना कायमस्वरूपी घरे दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुंबई :- मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी त्यांच्या खात्याचा आढावा घेतला. या बैठकीत मुंबईकरांच्या घरांबाबत चर्चा झाली.गृहनिर्माण विभागाचा सर्वात मोठा प्रकल्प, धारावी पुनर्विकास सुरू आहे. Dharavi Home Project या प्रकल्पाबाबत अनेक वेळा गदारोळ झाला, मात्र एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाची बैठक घेत अपात्र झोपडपट्टीधारकांना घरे देण्यासाठी आढावा घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
धारावीमध्ये 2007 पूर्वीचे 60 हजारांहून अधिक पात्र झोपडपट्टीधारक आहेत. सद्यस्थितीत अनधिकृत झोपडपट्टीवासीयांची संख्या 1 लाखाच्या वर पोहोचली आहे. या सर्वांना घरे देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली.
एकनाथ शिंद यांनी बैठकीत सांगितले की, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने लोकांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते सरकार अपयशी ठरले. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळात सर्वांना घरे देण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले.धारावीच्या विकासाबाबतच्या सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. पुनर्विकास प्रकल्पाबाबत विरोधकांनी वारंवार खोटे आरोप केले आहेत. त्यामुळे सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.
गृहनिर्माण विभाग हा लोकांच्या मनाचा विषय आहे. घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. म्हाडा, एसआरएमध्ये घर मिळवण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती सोपी करा. लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू नये. यासाठी जास्तीत जास्त प्रक्रिया ऑनलाइन करा. अधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. मला सर्वसामान्यांसाठी ठोस काम करायचे आहे.