क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Breaking News : खाद्यपदार्थाची गाडी बंद करायला गेल्याने महिला पोलिसावर हल्ला; प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाच्या हाताचा चावा

Pune Wanwadi Latest Crime News : वानवडीच्या खाऊ गल्लीत मध्यरात्री थरार, दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल

पुणे :- पुणे शहरातील वानवडी भागात पोलिसांवरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वानवडीतील संविधान चौकात मध्यरात्री खाऊ गल्लीतील एक गाडी बंद करण्यासाठी गेलेल्या एका प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा एका महिलेने चावा घेतला, तर दुसऱ्या महिलेने त्यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

खाद्यपदार्थाची गाडी बंद करायला गेल्याने महिला पोलिसावर हल्ला; प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाच्या हाताचा चावा

वानवडी पोलीस ठाण्यात Wanwadi Police Station प्रशिक्षणार्थी महिला उपनिरीक्षक सारिका शिर्के कार्यरत आहेत. रविवारी रात्री त्या वानवडीतील संविधान चौकात गस्तीवर होत्या. त्यावेळी त्यांनी येथील खाऊ गल्लीत भगवती सौंद आणि सुमित्रा थापा यांची खाद्यपदार्थाची गाडी सुरू असल्याचे पाहिले. रात्री उशिरापर्यंत गाडी सुरू असल्याने त्यांनी दोन्ही महिलांना गाडी बंद करण्यास सांगितले.

मात्र, त्या दोन्ही महिलांनी पोलिसांच्या सूचना ऐकण्याऐवजी त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या भगवती सौंद हिने थेट उपनिरीक्षक सारिका शिर्के यांच्या हाताचा चावा घेतला. त्याचवेळी सुमित्रा थापा या महिलेनेही पोलिसांना शिवीगाळ केली. कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यासोबत असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी दोन्ही महिलांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0