Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात.. शेताची करतात पाहणी
•राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वर मधील आपल्या दरे या गावात तीन दिवसासाठी विश्रांती दौऱ्याकरिता गेले आहे
मुंबई :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून प्रचार सभा निवडणूक याच्यात पूर्णपणे व्यस्त होते जवळपास राज्यभरात आणि राज्य बाहेर अशावेळी शंभरहून अधिक सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्या होत्या या सगळ्या विश्रांतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस महाबळेश्वर मधील आपल्या दरे या गावात गेले आहे. तुझ्या गावात गेले असताना मुख्यमंत्री यांनी गावातील शेतीची पाहणी करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यामध्ये असे लिहिले आहे की कशाला जायचे परदेशी गड्या आपला गाव बरा… असे म्हणत मुख्यमंत्री यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओतून मुख्यमंत्री यांनी गावातील शेतीची पाहणी केली आहे तसेच गोठ्यातील गुराखी चौकशी करून त्यांना घास भरविलेला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर टाकलेला व्हिडिओ
परदेशी कशाला जायाचं…गड्या आपला गाव बरा …शेत पिकाची दुनिया न्यारी….वसे जिथे विठूरायाची पंढरी…लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.