Eknath Khadse-Girish Mahajan Feud Intensifies: हनीट्रॅपच्या आरोपांवरून महाजनांचा खडसेंना प्रतिटोला; ‘गुलाबी गप्पा’ म्हणत शेअर केला व्हायरल फोटो
मुंबई :- खानदेशातील राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. एकमेकांना चिमटे काढण्याची एकही संधी न सोडणारे हे दोन्ही नेते आता ‘गुलाबी’ रंगात रंगले असून, हनी ट्रॅपच्या आरोपांवरून महाजनांनी खडसेंना खास ठेवणीतील ‘बाण’ सोडला आहे. यामुळे खानदेशात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. Eknath Khadse-Girish Mahajan Feud Intensifies
गेल्या काही दिवसांपासून खडसे आणि महाजन यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर, महाजनांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर दोन फोटो पोस्ट करत एकनाथ खडसेंना लक्ष्य केले आहे. या फोटोंमध्ये गुलाब घेतलेली एक व्यक्ती आणि गाडीत बसलेले नाथाभाऊ (एकनाथ खडसे) दिसत आहेत. या फोटोंसोबत महाजनांनी अत्यंत मोजक्या शब्दांत मोठा राजकीय संदेश दिला आहे.
गिरीश महाजन यांनी आपल्या पोस्टमध्ये खडसेंना उद्देशून म्हटले आहे की, “एकनाथ खडसे… तुमच्या या ‘गुलाबी गप्पा’ कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय.” इतकेच नाही, तर महाजनांनी पुढे म्हटले आहे की, “हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारुडा बोलला होतात? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे.” खडसे आणि लोढा यांचा फोटो शेअर करत महाजनांनी अप्रत्यक्षपणे अनेक जुन्या प्रकरणांना पुन्हा उजाळा दिला आहे.
महाजनांनी आपल्या मनातील सल व्यक्त करताना म्हटले आहे की, “2019 ते 2022 च्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच.”
आता त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन खडसे आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याबद्दल महाजनांनी खडसेंना डिवचले आहे. “एकनाथ खडसे, काय ही तुझी व्यथा?” म्हणत महाजनांनी खडसेंना पुन्हा सवाल केला आहे. एकनाथ खडसेंना गुलाब देताना प्रफुल्ल लोढांचा व्हायरल झालेल्या फोटोवरून हे नवे राजकीय ‘गुलाबी युद्ध’ सुरू झाले आहे. “माझ्यावर असंख्य आरोप केले, पण मी निर्दोष असल्याचे वारंवार सिद्ध झाले,” असे महाजन यांनी पुन्हा ठामपणे सांगितले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…