क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Rape News : 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला जन्मठेप

Pune Latest Crime News : अत्याचारामुळे मुलीवर शस्त्रक्रिया करावी लागली; ‘मुस्कान’ संस्थेची पीडितेला मदत

पुणे :- तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या तिच्याच सावत्र वडिलांना पुणे न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने आरोपीच्या क्रौर्याची नोंद घेत, हा गुन्हा घृणास्पद असल्याचे नमूद केले. Pune Latest Crime News

वारजे येथील क्रूर घटनेतील आरोपीला मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा; न्यायालयाने दाखवली कठोरता

5 फेब्रुवारी 2018 रोजी ही धक्कादायक घटना वारजे माळवाडी येथे घडली होती. पीडित मुलीच्या आईने दोन महिन्यांपूर्वीच आरोपीशी विवाह केला होता. घटनेच्या दिवशी, रात्री 9 वाजता आरोपीने पत्नीशी भांडण केले आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने घराबाहेर घेऊन गेला. मध्यरात्री साडेबारा वाजता जेव्हा तो मुलीला घेऊन परत आला, तेव्हा ती रक्ताने माखलेली होती. घाबरलेल्या आईने तात्काळ वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद महत्त्वाचा

या खटल्यात विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी बाजू मांडली. फिर्यादी महिलेच्या वतीने ॲड. गौरव जाचक यांनी युक्तिवाद केला. ‘मुस्कान’ या स्वयंसेवी संस्थेनेही पीडित महिलेला मोठी मदत केली. या खटल्यात एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली. फिर्यादी महिला आणि चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

सरकारी वकील कोंघे यांनी युक्तिवादात सांगितले की, आरोपीने केलेल्या क्रौर्यामुळे चिमुरडी गंभीर जखमी झाली. तिच्यावर तीन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते आणि तिला शस्त्रक्रियेलाही सामोरे जावे लागले. आरोपीने केलेला हा गुन्हा अत्यंत घृणास्पद असून, त्याला कठोर शिक्षा द्यावी अशी विनंती त्यांनी केली.

न्यायालयाने आरोपीने केलेला ‘अपघातात मुलगी जखमी झाल्याचा’ बनाव फेटाळून लावला. आरोपी कोणताही पुरावा सादर करू शकला नाही, असे निकालपत्रात स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0