एकल महिलांना पुण्यधाम ट्रस्ट संचलीत पुण्यधाम आश्रम पुणे यांनी रब्बीच्या पेरणीसाठी हरभरा बियानांचे वाटप

कळंब – दि.०७/११/२०२५ रोजी धाराशिव जिल्ह्यातील 500 पूरग्रस्त विधवा, परितक्ता, एकल महिलांना पुण्यधाम ट्रस्ट संचलीत पुण्यधाम आश्रम पुणे यांनी रब्बीच्या पेरणीसाठी हरभरा बियानांचे वाटप दि. 06 नोव्हेंबर रोजी पर्याय सामाजिक संस्था हसेगाव (के) येथे करण्यात आले, पुण्यधाम च्या माता कृष्ण कश्यप आणि पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुण्यधाम धाम चे ट्रस्टी गणेश कामठे म्हणाले की, आपण समाजाचे कांही तरी देणे लागतो त्यामुळं आज आपण संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे आश्रू पुसले पाहिजेत असे वाटले आणि या बियाणे वाटपाचे काम हाती घेतले, आपण शेतकरी या जगाचे पोशिंदे आहोत, आपण कोणापुढेही हात पसरणारे नाहीत, आम्ही या पुढे सुद्धा पुण्यधाम कडून 1000 टक्के मदत करू असे सांगितले, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाम मरळ, सूर्यकांत कामठे, निलेश काकडे हे उपस्थित होते.
पर्याय चे कार्यवाहक विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी अध्यक्षीय भाषण केले, बाळासाहेब धस, विलास गोडगे, सुनंदा खराटे यांनी मार्गदर्शन केले तसेच ऋषिकेश तोडकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिताताई तोडकर, भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे, परमेश्वर गवारे, विकास कुदळे, प्रमिला राख, आनंद जाधव, कल्पना जतकर, अश्विनी काकडे, निकिता चंदनशिवे, शकुंतला गोडगे, जयश्री कोठावळे, रियाज शेख, अशोक शिंदे, अजहर तुटके, दिगंबर लडके यांनी विशेष परिश्रम घेतले.

Deepak

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

31 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago