महाराष्ट्र
Trending

Eid Milad Holiday : ईद-ए-मिलादची सुट्टी मुंबईत 8 सप्टेंबरला

Eid Milad Holiday In Mumbai : मिरवणुकीमुळे सुट्टीच्या तारखेत बदल; राज्याच्या इतर जिल्ह्यांसाठी 5 सप्टेंबरची सुट्टी कायम

मुंबई :- मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलाद सणाच्या सार्वजनिक सुट्टीत बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार, पूर्वी जाहीर केलेली 5 सप्टेंबरची सुट्टी रद्द करून आता सोमवार, 8 सप्टेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सुट्टी बदलाचे कारण

ईद-ए-मिलादचा सण आणि जुलूसचा कार्यक्रम मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावर्षी 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने, दोन्ही समुदायांत शांतता आणि ऐक्य राखण्यासाठी विविध मुस्लीम संघटनांची बैठक झाली होती. या बैठकीत मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम 8 सप्टेंबरला आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, राज्य सरकारने विशेष अधिकारांचा वापर करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी सुट्टीच्या तारखेत बदल केला आहे.
या दोन्ही जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्याच्या इतर जिल्ह्यांसाठी मात्र शुक्रवार, 5 सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात आली आहे.

शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही समाजाच्या लोकांना शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन केले. या बैठकीला विविध मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0