Sitaram Gupta ED Raids : ईडीने छापेमारी करत वसई विरार परिसरातील 41 बेकायदेशीर इमारतीवर कारवाई करत अडीच हजार कुटुंब बेघर झाले आहे
विरार :- वसई – विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात सक्तवसुली संचलालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वसई – विरार महापालिकेच्या हद्दीतील 13 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात येत आहे. Sitaram Gupta ED Raids या सर्व प्रकरणामुळे अडीच हजार कुटुंब बेघर झाली होती. हा प्रकार 2009 पासून सुरू असून ईडीने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे. हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. बहुजन विकास आघाडी पार्टीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर कारवाई झाली. आता या प्रकरणात गुप्तावर ईडीने छापेमारी केली आहे.
बहुजन विकास आघाडी पार्टीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याने बेकायदेशीर इमारती उभ्या करून सामन्यांची फसवणूक केली. त्याच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. गुप्तावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा झाला आहे. ईडीकडून वसई विरारमध्ये 13 ठिकाणी मोठे सर्च ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे.
त्यांचीही ईडी तपासणी करणार आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये नालासोपारा परिसराती 41 अनधिकृत बांधकामे महापालिकेने तोडली होती. प्राथमिक तपासणीत रहिवाशांना इमारत अनधिकृत असल्याची कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे 2500 कुटुंबे रस्त्यावर आली होती. याप्रकरणी ईडी अधिक तपास करीत आहे.
मीरा – भाईंदर पोलीस आयुक्तालयामार्फत दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधारे ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सुमारे 60 एकर क्षेत्रफळावर बेकायदेशीरपणे 41 राहिवासी व व्यावसायिक इमारती उभारण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा डेपो आरक्षित होते. पण आरोपींनी संगनमत करून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले. त्यासाठी आरोपी बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक दलालांनी मंजुरीची बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्याद्वारे सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांना मोठ्या प्रमाणात सदनिकांची विक्री करण्यात आली. त्यामुळे अनेक गरीब व निरपराध नागरिकांची फसवणूक झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…