नशेत अत्याचार : हवाई सेविकेवर पार्टीनंतर बलात्कार; आरोपीला विमानतळावरून अटक

Thane Latest Crime News : नवघर पोलिसांची तात्काळ कारवाई; हाँगकाँगला पळून जाण्याच्या तयारीत होता 25 वर्षीय सहकारी
मुंबई | लंडनस्थित विमान कंपनीत कार्यरत असलेल्या 23 वर्षीय हवाई सेविकेवर तिच्याच सहकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं. तो हाँगकाँगला कायमस्वरूपी पळून जाण्याच्या तयारीत होता. Thane Latest Crime News
मैत्रीचं रूपांतर विकृत अत्याचारात
पीडिता आणि आरोपी यांची ओळख 29 जून रोजी लंडनच्या प्रवासादरम्यान झाली होती. दोघेही एका विमान कंपनीत काम करत असून, एकत्र प्रवासानंतर ते मुंबईत परतले. काही दिवसांनी आरोपीने तिला एका खासगी पार्टीसाठी आमंत्रित केले. तिथे हेतुपुरस्सर मद्यप्राशन करायला लावून, नशेच्या अवस्थेत पीडितेला उबरसारख्या ॲप आधारित टॅक्सीने मिरा रोड येथील आपल्या राहत्या घरी नेले.
तेव्हा रात्रीचे जवळपास 3 वाजत होते. पीडिता पूर्णपणे नशेत असताना तिचा प्रतिकार क्षीण असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे.
धमकीने गप्प बसवण्याचा प्रयत्न
घटनानंतर पीडितेला मानसिक धक्का बसला. तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आरोपीने दिली होती. काही दिवस परदेश दौऱ्यावर असलेली पीडिता परतल्यानंतर तिने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर IPC अंतर्गत बलात्कार (कलम 64), धमकी (कलम 351(1)), आणि जबरदस्ती (कलम 352) अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
गुन्हा नोंद होताच आरोपीने भारतातून पळून जाण्याचा प्लान आखला होता. त्याने हाँगकाँगमध्ये दुसऱ्या विमान कंपनीत नोकरी मिळवून व्हिसाही घेतले होते. मात्र नवघर पोलिसांनी तत्काळ सहार विमानतळ पोलिस आणि विमानतळ दक्षता विभागाशी समन्वय साधून, त्याला विमानात चढण्याआधीच ताब्यात घेतलं.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय लोखंडेमाळी करत आहेत.


